“उत्तम जमलेल्या मैफलीत एक विलक्षण आनंद मिळतो. कधीकधी तर असाही अनुभव येतो की, कुणी ‘दुसरं’च गात आहे आणि ‘आपण’ ते ऐकतो आहोत.” - मालिनीबाई राजूरकर

ग्वाल्हेर घराण्याची संगीत परंपरा अत्यंत सुरेलपणे पुढे नेणाऱ्या ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका मालिनीताई राजूरकर यांचं नुकतंच निधन झालं. त्यांना ख्याल, टप्पा गायकी, ठुमरी आणि नाट्यसंगीत यांसाठी ओळखलं जातं. कमालीच्या प्रसिद्धीपराङमुख असलेल्या मालिनीताईंची दीर्घ मुलाखत रोहिणी गोविलकर यांच्या ‘स्वरभाषिते’ या नुकत्याच अक्षर प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या पुस्तकात आहे. तिचा हा संपादित अंश..........